Michaung cyclone Alert : Tamil Nadu: चेन्नईमध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात साचले पाणी

'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात आज हे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे.
Published by :
Team Lokshahi

'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 24 तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात आज हे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हे वादळ उद्या आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 100 किलोमीटर राहू शकतो. चक्रीवादळामुळे तामिळनाडू सरकारने आज सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आह. तसंच रेल्वेनं 188 गाड्याही रद्द केल्या आहेत. वादळामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com