व्हिडिओ
Mahayuti | Devendra Fadnvis - Eknath Shinde यांच्यामध्ये दुरावा? Ajit Pawar साधली योग्य टायमिंग?
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन दुरावा? अजित पवारांनी साधली योग्य टायमिंग, जाणून घ्या संपूर्ण कथा.
एकनाथ शिंदे राजभवनात दाखल होताच अजित पवारांनी आपल्या खुर्चीवरुन उठत देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवले. देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या बाजूला बसत होते. मात्र अजित पवार स्वत: बाजूला झाले आणि देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यासाठी जागा दिली. दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन दुरावा झाल्याची चर्चा रंगली होती आणि याचदरम्यान एकनाथ शिंदेंच्या बाजूला देवेंद्र फडणवीसांना बसवून अजित पवारांनी योग्य टायमिंग साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.