हिंगोली जिल्ह्यात संत्र्यांच्या बागांवर रोगाचा प्रादुर्भाव

संत्र्यांच्या बागांवर रोगाचा प्रादुर्भाव
Published by :
Siddhi Naringrekar

गजानन वाणी, हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठं नुकसान झालं असून त्यानंतर आता संत्र्यांच्या बागांवर विविध रोगाचा प्रादुर्भाव पडत असल्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी देखील मोठ्या संकटात सापडले आहेत.

संत्र्यावर लासा, पांढरी माशी या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे संत्र्यांच्या झाडांना गळती लागली आहे. संत्र्याची पाने पिवळी पडत असून संत्रे देखील गळून पडत आहेत.

महागड्या औषधांच्या फवारण्या करून देखील संत्रे गळून पडत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com