Bhiwandi: स्त्री रोग तज्ञ नसल्याने रुग्णांची गैरसोय; रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर
भिवंडी शहरातील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयामध्ये 11 ऑगस्ट 2024 पासून स्त्रीरोग तज्ञ नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असून भिवंडी शहर व ग्रामीण भागातून अनेक रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात येत असतात. यावेळी डॉक्टर व परिचारिकांनी अनेक वरिष्ठ डॉक्टरांना कळवूनही देखील स्त्री रोग तज्ञ आणि नवजात शिशू सुरक्षा कक्षेत डॉक्टर 24 तास उपलब्ध झाले नसल्यामुळे अत्यावश्यक वेळी, प्रसुती वेळी परिचारिका निर्णय घेऊ शकत नाही. अशावेळी आम्हाला त्यासाठी 24 तास डॉक्टर पाहिजे असतात.
त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचारी स्त्रीरोग विभाग बेमुदत संपावर जात असल्यामुळे येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची सोय होत नसल्यामुळे व बालरोग तज्ञ डॉक्टर नसल्यामुळे नवजात बालकांची सुद्धा गैरसोय होत आहे. दरम्यान भिवंडी तालुक्यातील तब्बल 350 ते 450 गर्भवती महिलांच्या प्रसूत्या इंदिरा गांधी रुग्णालयात होत असल्याने सदर उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ आणि शिशु करिता तज्ञ डॉक्टरांच्या मागणीसाठी अपघात विभाग, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, त्रिरोग विभाग यांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.