व्हिडिओ
Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयाला भेट, मोहन भागवतांसोबत 15 मिनिटे चर्चा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संघ मुख्यालयाला भेट दिली आहे, तर मोहन भागवतांसोबत जवळपास 15 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संघ मुख्यालयाला भेट दिली आहे, तर मोहन भागवतांसोबत जवळपास 15 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. भाजपाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असताना दोघांमध्ये भेट झाल्याचं समोर आलं आहे. भेटासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात आलेली आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सध्या चर्चा सुरु असताना या सर्व संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिलेला आहे. या बातम्या केवळ माध्ययांमध्ये आलेल्या आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणतं आहेत. या सगळ्या स्पष्टीकरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली आहे.