व्हिडिओ
Navi Mumbai News: स्कुल बसवर महिला चालक ठेवण्याची मागणी; बदलापूरच्या घटनेमुळे पालकांमध्ये चिंता
बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. त्यामुळे आता शाळा प्रशासन राज्य सरकार आणि सामाजिक संस्था जागृत होताना दिसून येत आहेत.
बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. त्यामुळे आता शाळा प्रशासन राज्य सरकार आणि सामाजिक संस्था जागृत होताना दिसून येत आहेत. त्यामुळे स्कूल बसवर पुरुष ड्रायव्हरपेक्षा महिला ड्रायव्हर असाव्या अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
जी बदलापूरला घटना घडली त्याचं खरचं आम्ही सगळे दुःख व्यक्त करतो आणि त्याचा निषेध सुद्धा करतो. शाळेने ही दखल घेणं आवश्यक असतं. कुठल्याही शाळेमध्ये आपण आतमध्ये जाऊन बघू शकत नाही किंवा शाळेमध्ये पीटीए मेंबर आहेत ते कोण आहेत त्याची माहिती नाही. आमची अशी मागणी आहे की शाळेमध्ये हा महिला कर्मचाऱ्यांचा वर्ग जो कामगार क्षेत्र आहे ते मोठ्या प्रमाणात असावं. स्कुल बसवर महिला चालक ठेवण्याची मागणी पालकांनी केली आहे. जेणेकरुन हे अशा लैंगिक अत्याचाराच्या घटना घडणार नाहीत.