Sunil Kedar Bank Case : सुनिल केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय

सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार आहे. नागपूर जिल्हा न्यायालयात आज फैसला होईल.
Published by :
Sagar Pradhan

सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज निर्णय होणार आहे. नागपूर जिल्हा न्यायालयात आज फैसला होईल. सुनील केदारांना दिलासा मिळणार का? एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणातील राज्याचे माजी पशू संवर्धन व दुग्ध विकासमंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना शुक्रवारी पाच वर्षांची शिक्षा आणि एकूण साडेबारा लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. याप्रकरणी जामीन मिळावा व शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केदारांतर्फे सत्र न्यायालयाला करण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. त्यामुळे सुनिल केदार यांना दिलासा मिळमार का याकडे लक्ष लागलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com