Dahi Handi 2024: जखमी गोविंदांवरील उपचारांसाठी रुग्णालयं सज्ज
दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर लागतात आणि त्याचवेळेला काही गोविंदा जखमी ही होतात. अशा जखमी गोविंदांसाठी रुग्णालये सज्ज झालेली आहेत. राज्य सरकारसह पालिकेची रुग्णालये सज्ज आहेत. 2023मध्ये 200 गोविंदा जखमी झाले होते, त्यादरम्यान त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले आणि मुख्य म्हणजे मागच्यावर्षी सरकारकडून या गोविंदांसाठी विमासुद्धा जाहीर करण्यात आला होता.
तर दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई ठाणे परिसरात लाखो रुपयांची पारितोषिक असलेल्या उंच दहीहंडी बांधण्यात आल्या आणि या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. मोठ्या दहीहंडी ज्याठिकाणी बांधल्या जातात त्याठिकाणी अशा दुर्घटना होण्याची शक्यता ही दाट असते. दरवर्षी दहीहंडी फोडताना मोठ्या प्रमाणात गोविंदा जखमी होतात या गोविंदांना तातडीने उपचार मिळावे यासाठी मुंबईतील राज्य सरकारसोबत महानगरपालिकेची रुग्णालये देखील सज्ज आहेत.