अरबी समुद्रात आज चक्रीवादळाची शक्यता आहे. किनारपट्टी भागात 45 ते 65 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गुजरात किनारपट्टीच्या उत्तरेला वादळाची शक्यता असून अरबी समुद्रात 60 वर्षांनंतर ऑगस्टमध्ये चक्रीवादळ येणार असल्याची माहिती मिळत आहे. सौराष्ट्र, कच्छमधील काही भागांत अतिवृष्टीची शक्यता देखील आहे.