Pik Vima : शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारनं मुदतवाढ दिली आहे. आज म्हणजेच 31 मार्च विक विम्यासाठी हफ्ता भरण्याची शेवटची तारीख होती. पण केंद्र सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता 3 ऑगस्टपर्यंत पिक विमा हफ्ता भरता येणार आहे. दरम्यान, पिक विम्यासंदर्भातील राज्य सरकारच्या विनंतीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फॉर्म भरताना सरकारची वेबसाईट योग्यप्रकारे चालत नसल्यानं शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशातच पिक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली शेवटची तारीख जवळ येत चालली होती. याच पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पिक विमा भरण्यासाठी वेबसाईट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. पावसाळी अधिवेशनात सुद्धा अनेक विरोधी पक्षातील आमदारांनी यासंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली होती .
बळीराजाच्या याच मागणीचा विचार करुन राज्य सरकारनं तशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. राज्याची हीच विनंती मान्य करत आता पिक विमा भरण्यासाठी केंद्राकडून 3 ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.