व्हिडिओ
Coronavirus : कोरोना जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज
नागपूर जिल्ह्यात कोवीडचे 22 रुग्ण सक्रिय आहेत. कोरोना जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
नागपूर जिल्ह्यात कोवीडचे 22 रुग्ण सक्रिय आहेत. कोरोना जेएन-वन व्हेरियंटचा संभाव्य धोका लक्षात घेता मनपाची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. नागपूर शहरातील विविध भागांमध्ये सध्या 46 केंद्रांवर कोरोना चाचणी सुरु आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी अधिकाधिक कोरोना चाचणीवर भर देण्याचे मनपा आयुक्तांचे निर्देश आहेत. मनपा मुख्यालयात आरोग्य विभागाची महत्त्वाची बैठक पार पडली. नागपूरात गेल्या 24 तासांत 11 रुग्णांची नोंद झाली आहे, तर ग्रामीण भागात एका रुग्णाची नोंद झाली आहे. यापैकी 4 रुग्ण रुग्णलयात असून त्यांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत.18 रुग्णांना सौम्य लक्षणे असून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.