व्हिडिओ
IPS Rashmi Shukla : महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव बदलून फोन टॅपिंग दल ठेवा; नाना पटोंलेचा हल्लाबोल
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती पोलीस महासंचालकपदी होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती पोलीस महासंचालकपदी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. रश्मी शुक्ला या पूर्वी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त होत्या. त्यावेळी त्या फोन टॅपिंग प्रकरणी चर्चेत आल्या होत्या. त्यांनी राजकीय नेत्यांचे अवैधरित्या फोन टॅप करुन देवेंद्र फडणवीस यांना माहिती पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
आता, त्यांची नियुक्ती पोलीस महासंचालकपदी होण्याची चर्चा सुरू झाली आहे आणि यावर त्यावर काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे. फोन टॅपिंग प्रकरणी त्यांच नाव आल्यामुळे त्यांना क्लीन चिट मिळाली होती तरी त्यांना सरकार महासंचालकपदाची बक्षिसी देत असल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. रश्मी शुक्ला या भाजपधार्जिण असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केला आहे.