व्हिडिओ
राहुल गांधी यांची जात विचारल्याने काँग्रेस आक्रमक; आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन
राहुल गांधीची जात विचारल्याने काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
राहुल गांधीची जात विचारल्याने काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी जातीय गणना झाली पाहिजे अशी मागणी संसदेमध्ये केली होती.
त्यानंतर खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांना सभागृहात जात विचारल्यामुळे काँग्रेस पक्ष आक्रमक झाले आहेत.भाजपविरोधात काँग्रेसकडून आज देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाकडून पत्र काढून सर्व जिल्हाध्यक्षांना याची माहिती देण्यात आली आहे.