Tilari Project : 'तिलारी'तील कालव्यांच्या पुनरुज्जीवनासाठी 330 कोटी खर्चास मान्यता

महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांसाठी तिलारी आंतरराज्य प्रकल्प महत्वाचा आहे.
Published by :
shweta walge

महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या संयुक्त व महत्वाकांक्षी तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्यांच्या पुनरुज्जीवनाकरिता ३३० कोटी रुपयांच्या खर्चास आज मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांसाठी तिलारी आंतरराज्य प्रकल्प महत्वाचा आहे. तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पाच्या नियंत्रण मंडळाच्या 6व्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक पार पडली.

Tilari Project
Shrikant shinde : ही युती वेगळ्या विचारांची, ‘त्यांना’ नाही कळणार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com