Eknath Shinde: महाबळेश्वर येथे विभागीय नाट्य संमेलन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाट्यसंमेलनात भाषण
नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत. यामध्ये ५२ नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नाट्य संस्कृतीबाबत मत व्यक्त केले. मुख्यमंत्री म्हणाले, अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी काळानुरूप रंगभूमीने अनेक बदल स्वीकारले. त्यामुळेच व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. अनेक अडचणींवर मात करत सध्या मराठी रंगभूमी पुढे जात आहे. अशावेळी नाट्यसंमेलनांसारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात. राज्यातील नाट्यगृहे सर्व सुविधा संपन्न असावीत व परिपूर्ण असावी यासाठी अकरा तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.