CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जात असून देशातील आठ राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार असून महाराष्ट्र, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा ओडिसा या आठ राज्यांचा समावेश आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com