Chandrapur : ग्रामस्थांची जीवघेणी कसरत; दाद कुणाकडे मागायची? ग्रामस्थांचा सवाल

चंद्रपूर शहरातील सखल भागातला पूरओसरला, आता रोगराईची भीती, सार्वजनिक स्वच्छतेसाठी चंद्रपूर महानगरपालिका सरसावली
Published by :
Team Lokshahi

चंद्रपूर: शहरातल्या पूरग्रस्त भागातून पुराचं पाणी ओसरल्यावर या भागात महानगरपालिकेने साफसफाईला सुरुवात केली आहे. पुराचं पाणी ओसरलं, तरी अजूनही अनेक भागात पाणी, चिखल आणि कचरा साचलाय. यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. हीच भीती लक्षात घेता रहमतनगर, सिस्टर कॉलनी, उमाटे लेआऊट या परिसरात फॉगिंग, स्प्रेयिंग आणि कीटकनाशके फवारण्यात येत आहेत. स्वतःच्या घराची स्वच्छता करण्यात गुंतलेल्या नागरिकांसमवेत सार्वजनिक स्वच्छतेसाठी चंद्रपूर महानगरपालिकेने विविध पथकाद्वारे स्वच्छता मोहिमेला वेग दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com