व्हिडिओ
UGC Net Exam: केंद्राकडून यूजीसी नेट परीक्षा रद्द, नव्याने घेतली जाणार परीक्षा
केंद्राकडून यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने कानउघाडणी केल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
केंद्राकडून यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने कानउघाडणी केल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता नव्याने परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. नीट परीक्षेचं काय होणार याकडे आता विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे.
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढत यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. पेपर फुटल्याचा संशय असल्याने तसेच या परीक्षेची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचं शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.