व्हिडिओ
बीड, जालना, छत्रपती संभाजीनगरची बस, इंटरनेट सेवा बंद; बीड-जालना जिल्ह्याची बॉर्डर सील
मनोज जरंगे पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बीड जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये आलं आहे.
मनोज जरंगे पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर बीड जिल्हा पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. अहमदनगर आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा चौख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात 38 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तर परवानगीशिवाय जिल्ह्यात प्रवेश बंदी देखील असणार आहे. अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचं दिसून येत आहे.