BJP Vidhan Sabha Election Updates : भाजप सुमारे 153 जागांवर लढण्याची शक्यता

विधानसभा निवडणूकीकरता भाजपने 110 उमेदवार निश्चित केले असल्याचं आता समोर आलं आहे. केंद्र निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता सर्व पक्ष बैठकी घेण्यासाठी तयारीत लागलेले आहेत.
Published by :
Team Lokshahi

विधानसभा निवडणूकीकरता भाजपने 110 उमेदवार निश्चित केले असल्याचं आता समोर आलं आहे. केंद्र निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता सर्व पक्ष बैठकी घेण्यासाठी तयारीत लागलेले आहेत या बैठका सगळ्याच पक्षांमध्ये होत आहेत. केंद्रीय निवडणुक समितीच्या बैठकीत आता अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

भाजपाच्या 110 जागांवरील उमेदवारांवर शिक्का मोर्तब झाल्याच समोर आलं आहे. भाजपची पहिली यादी उद्या समोर येण्याची शक्यता आहे. भाजप 153 जागांवर लढण्याची शक्यता आहे तर 90 टक्के जागांवर समितीचं एकमत झालं आहे अशी माहिती मिळत आहे. 40 आमदारांचं तिकिट कापल जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com