Raigad : रायगडची जागा भाजपलाच मिळावी, कार्यकर्त्यांचा आग्रह, प्रमोद सावंत यांच्याकडून समर्थन

रायगडसह मावळच्या जागेवर पुन्हा भाजपने दावा केला आहे. रायगडची जागा भाजपलाच मिळावी असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

रायगडसह मावळच्या जागेवर पुन्हा भाजपने दावा केला आहे. रायगडची जागा भाजपलाच मिळावी असा आग्रह भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी आग्रह केला आहे. रायगडची जागा भाजपला मिळाली नाही तर फार वाईट होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कार्यकर्त्यांच्या मागणीचे डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून मात्र समर्थन करण्यात आलं आहे. रायगड बरोबरच मावळ लोकसभा जागेसाठी भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. त्यावर बोलताना डॉ. प्रमोद सावंत यांनीही कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर केला. भाजपची ताकद पाहता कार्यकर्त्यांची मागणी चुकीची नाही. मी देखील भाजपला उमेदवारी मिळेल असे प्रयत्न करीन. यावेळी कोकणातील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही असे सावंत यांनी स्पष्ट केले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com