व्हिडिओ
Bihar Caste Census : नितीश कुमार यांनी जाहीर केली जातीनिहाय जनगणना
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मास्टर स्ट्रोक मारला आहे. बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना जाहीर करण्यात आली आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मास्टर स्ट्रोक मारला आहे. बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याबाबत घोषणा केली आहे.
जातीनिहाय जनगणना जाहीर करणारं बिहार हे देशातील पहिलंच राज्य ठरलं आहे. बिहार सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ओबीसींच्या लोकसंख्या 63 टक्के आहे. मागास प्रवर्गाची लोकसंख्या 27 टक्के, तर अतिमागास प्रवर्ग 36 टक्के, दलितांची संख्या 19 टक्के तर अनुसूचित जमातींची संख्या केवळ 2 टक्के आहे.
जातीनिहाय जनगणनेमुळे बिहारमध्ये पुन्हा एकदा मंडल राजकारणाची एन्ट्री झाल्याचं बोललं जात आहे. तर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये जातीय जनगणनेची मागणी होत आहे.