रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोकणाकडे जाणारे चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले आहेत.

लोणेरे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. मागील एक तासापासून कोकणाकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. दोन्ही लेन वरती वाहने आल्याने महामार्ग जाम झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com