Chhagan Bhujbal | भुजबळांबाबत राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकातून मोठा खुलासा, भुजबळ काय म्हणाले?

छगन भुजबळ यांनी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर गेल्याचा दावा राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकात केला आहे. मात्र भुजबळांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत. जाणून घ्या भुजबळ काय म्हणाले.
Published by :
shweta walge

‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर गेलो' असा खळबळनक दावा छगन भुजबळांचा राजदीप सरदेसाईंच्या पुस्तकातून करण्यात आला आहे. मात्र मी कुठलीही मुलाखत दिली नाही म्हणत भुजबळांनी पुस्तकातील सर्व दावे फेटाळले आहेत.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका… ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला… माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता…’ अशा नि:संदिग्धपणे राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते व राज्याचे अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सूचित करतात. हा सारा तपशील ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात नोंदवण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com