Bhaskar Jadhav On shivaji maharaj statue collapse| राजकोट पुतळा दुर्घटनेवर भास्कर जाधवांचं वक्तव्य

राजकोटमधील पुतळा दुर्घटनेवर भास्कर जाधवांनी एक वेगळ विधान केलं आहे. पुतळा दिवसा पडला म्हणून काही तरी अनिष्ट टळलं.
Published by :
Team Lokshahi

राजकोटमधील पुतळा दुर्घटनेवर भास्कर जाधवांनी एक वेगळ विधान केलं आहे. पुतळा दिवसा पडला म्हणून काही तरी अनिष्ट टळलं. पुतळा रात्री पडला असता तर ते इतर धर्मियांवर टाकलं असतं. असं महत्त्वाचं वक्तव्य भास्कर जाधवांनी केलेलं आहे.

यावर भास्कर जाधव म्हणाले की, पुतळा पुर्णपणे पोकळ वारा समुद्राकडून पश्चिमेकडून पुर्वेला वाहतो. पुतळा पश्चिमेला पडला आहे आणि त्याचे तुकडे तुकडे झाले आहेत काय कास्टिंग होत ? पंचधातूच्या पुतळ्याचे किंवा धातूचे एवढे तुकडे होऊ शकतात का ? हा इतका भ्रष्टाचार राज्याचे मुख्यमंत्र्यांची नजर आहे कुठे ? बांधकाम मंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची नजर आहे कुठे ? साध कोणी ही दगड मारावी इतक भंगार काम या पुतळ्याचं या लोकांनी केललं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा या लोकांनी किती भ्रष्टाचार केलेला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com