व्हिडिओ
Bhandara: भंडारा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा, गारपिठीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान
भंडारा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसलाय. जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास तुफान गारपीट झाली आहे तर गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. गहू, हरभऱ्यासह धान पिकांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासह 300 ग्रॅम वजनाची गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणात शेत पिकांचं नुकसान झालं आहे. भंडाऱ्याच्या पहिल्या क्षेत्रातील चोवा, नवरगाव आणि परिसरातील नागरिकांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. या अवकाळी पावसानं रब्बी, हंगामातील गहू, धान पीक, चना, यासह पालेभाजी पिकांना मोठा फटका बसला आहे. टोमॅटो, वांगी पिकं गारपीटमुळं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. तर, काही कौलारू घरांनाही नुकसानीचा सामना करावा लागला आहे. या अवकाळी पावसामुळं शेतकरी पुरता हतबल झाला आहे.