व्हिडिओ
Beed: ड्रोन टेहळणी प्रकरणाची चौकशी; दहशतवादीविरोधी कक्षाकडून चौकशीला सुरुवात
बीडमधील ड्रोन टेहळणी प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातील गावांवर घिरट्या घालणाऱ्या ड्रोन बाबत दहशतवादी कक्षाकडून चौकशी सुरू झालीय.
बीडमधील ड्रोन टेहळणी प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातील गावांवर घिरट्या घालणाऱ्या ड्रोन बाबत दहशतवादी कक्षाकडून चौकशी सुरू झालीय. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात विविध ठिकाणी ड्रोन घिरट्या घालत आहे. गेवराई, माजलगाव, शिरूर, आष्टी, पाटोदा आणि वडवणी तालुक्यात आत्तापर्यंत 30 ते 40 गावांमध्ये रात्री ड्रोन घिरट्या घालताना आढळून आले.
तर दहशतवादीविरोधी कक्षाकडून चौकशीला सुरुवात केल्याच दिसून आलं आहे. गेल्या काही दिवसांत 30 ते 40 गावांमध्ये टेहळणीचा प्रकार याठिकाणी सुरु आहे. यादरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलाला याठिकाणी पकडल गेलं होत आणि त्यानंतर चौकशीला वेग आल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ड्रोन टेहळणीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.