MNS : विधानसभेसाठी मनसेचा पहिला उमेदवार ठरला? साईनाथ बाबर यांच्या नावाची चर्चा

विधानसभेसाठी मनसेचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा आहे. हडपसर विधानसभेत मनसेचा शिलेदार रिंगणात उतरण्याची माहिती आहे.
Published by :
Dhanshree Shintre

विधानसभेसाठी मनसेचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा आहे. हडपसर विधानसभेत मनसेचा शिलेदार रिंगणात उतरण्याची माहिती आहे. साईनाथ बाबर यांच्याकडून विधानसभेच्या तयारीला सुरुवात झालेली आहे. मनसे नेते साईनाथ बाबरांचा हडपसर विधानसेभवर दावा पाहायला मिळत आहे.

साईनाथ बाबर मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आहेत. राज ठाकरेंच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर मनसेचा पहिला उमेदवार ठरल्याची चर्चा आता रंगलेली आहे. वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर हडपसर मधून मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरणार आहे. साईनाथ बाबर यांनी व्हाट्सअप स्टेट्स ठेवत तयारी सुरु केली.

MNS : विधानसभेसाठी मनसेचा पहिला उमेदवार ठरला? साईनाथ बाबर  यांच्या नावाची चर्चा
J. J. Hospital : मुंबईच्या जे जे रुग्णालयातही येणार यंत्रमानव; यंत्रमानव करणार मोठमोठी ऑपरेशन्स
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com