व्हिडिओ
Bawankule On Vidhansabha | महायुतीच्या 100 जागांचं वाटप लवकरच होणार; बावनकुळेंचं सूचक वक्तव्य
महायुतीच्या 100 जागांच वाटप लवकरचं होणार आहे. जवळपास 70 ते 75 टक्के जागांचं महायुतीचं एकमत झाल्याचं कळतं आहे.
महायुतीच्या 100 जागांच वाटप लवकरचं होणार आहे. जवळपास 70 ते 75 टक्के जागांचं महायुतीचं एकमत झाल्याचं कळतं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात एक सुचक वक्तव्य केलं. महायुतीमध्ये घटक पक्षाची भूमिका वेगवेगळी असली तरी आमचा उद्देश मोदींना 2029 पर्यंत सहकार्य करण्याचा आहे असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. महाविकास आघाडीची सत्ता आल्यास सर्व योजना बंद करतील असं देखील बावनकुळे यांनी म्हटलं आहे. अजित पवार हे खंबीर नेते आहेत ते महायुतीसोबतचं राहतील असं देखील महत्त्वाचं वक्तव्य बावनकुळे यांनी केलेलं आहे.
यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्या सीटवर चांगला उमेदवार आहे ज्या सीटवर एकनाथ शिंदे येऊ शकतात त्याठिकाणी एकनाथ दिला, ज्याठिकाणी अजित पवार जिंकून येऊ शकतात त्याठिकाणी अजित पवार दिला भाजप तिथे भाजप.