Bawankule On Rahul Gandhi |अकोलामध्ये बावनकुळेंच्या नेतृत्वात राहुल गांधींच्या विरोधात भाजपचं आंदोलन

अकोल्यामध्ये राहूल गांधीच्या विरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे.

अकोल्यामध्ये राहूल गांधीच्या विरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे. आक्रमक कार्यकर्तांनी राहूल गांधींचा पुतळा जाळला आरक्षणावरील वक्तव्यावरून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे.

यावर बावनकुळे म्हणाले, ज्या ज्याठिकाणी राहूल गांधी येईल त्याठिकाणी महाराष्ट्रात आम्ही राहूल गांधीला प्रश्न विचारणार आहोत त्यांच्या सभेत जाऊन त्यांना प्रश्न विचारणार आहोत. पहिलं ही भूमिका स्पष्ट करा महाराष्ट्रात पाय ठेवताना तुम्ही ओबीसी आरक्षण, एसी आरक्षण, एस टी आरक्षण इथे मोदी हे आरक्षण देण्याकरिता काम करतं आहेत आणि हे महाशय आरक्षण काढायला जात आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आजचा आमचा हा पहिला संघर्ष होता हा संघर्ष तीव होत पुढे सुरु राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com