अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा बर्फीवाला उड्डाणपूल सुरू होताच काही तासांत पुन्हा बंद

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा बर्फीवाला उड्डाणपूल सोमवारी सकाळी सुरु करण्यात आला.
Published by :
Siddhi Naringrekar

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा बर्फीवाला उड्डाणपूल सोमवारी सकाळी सुरु करण्यात आला. मात्र काही तासांमध्येच पुन्हा तो बंद देखील करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 4 जूलैपासून दोन्ही पुलाची वाहतूक सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कुणीतरी खोडसाळपणा करुन हा पूल सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. पालिका प्रशासनाने मात्र याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com