Baramati Heat Wave : प्राध्यापकाचा अनोखा प्रयोग; विनाखर्चात मिळवा एसीसारखी हवा

बारामतीतील प्राध्यापकाचा अनोखा प्रयोग
Published by :
Siddhi Naringrekar

उन्हाळा येवढा वाढलाय की अंगाची चांगलीच लाही लाही होतेय. यामुळेच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी बारामतीतील डॉ.भगवान माळी यांनी विनाखर्चीक गारव्याचा मंत्र दिलाय. अर्थात हा कुठला जादू टोण्याचा मंत्र नाहीये. तर या प्रयोगाला वनस्पती शास्त्राचा आधार आहे.

बारामतीतील टि.सी. कॅालेजमध्ये प्राध्यापक असणाऱ्या डॅा.भगवान माळी यांनी उन्हाळ्यापासुन वाचण्यासाठी एक प्रयोग केलाय. प्रयोगामुळे घरात गारवा मिणार असून यासाठी तुम्हाला काही खर्च करण्याची आवश्यकता नाहीये.. यासाठी घरातील पंख्याखाली फरशीवर किंवा टीपॉयवर दोन ट्रे मध्ये सुती फडके ठेवून त्यात लिटभर पाणी ओतायचे. यामुळे पंख्यातून येणारी हवा या ट्रेमध्ये धडकून आजूबाजूला पसरते. यामुळे घरातील वातावरण गारवा पसरतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com