नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी

नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कमलाकर बिरादार, नांदेड


नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरवर 'जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, पुन्हा येणार' अशा आशयाचे लिहिण्यात आलं आहे. या बॅनरची सध्या चर्चा रंगली आहे.

शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आल्याचे पाहायला मिळत असून उद्या नांदेड येथे महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षाने शहरात मोठी बॅनरबाजी केली आहे. त्यातच " जनतेच्या मनातील मुख्यमंत्री पुन्हा येणार, लाडक्या बहिणीचा देवा भाऊ पुन्हा येणार " असा उल्लेख असलेले देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर लावण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com