Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी; बॅनरवर भावी मुख्यमंत्री उल्लेख

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दादरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दादरमध्ये बॅनरबाजी करण्यात आली आहे. उद्या 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्वत्र बॅनरबाजी करण्यात येत आहे.

या बॅनरमुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा उल्लेख करण्यात आला आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हावेत अशी शिवसैनिकांची मागणी आहे. तसेच संजय राऊतही अनेकदा म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com