Bangladesh violence:नाशिकहून बांगलादेशला जाणारे कांद्याचे ट्रक अडकून; व्यापाऱ्यांचे करोडोंचे नुकसान

बांगलादेशतील आराजकतेचा कांदा निर्यातीला फटका बसल्याचं दिसत आहे. कांद्याचे शेकडो ट्रक भारत बांगलादेशाच्या सीमेवर अडकलेले आहेत.
Published by :
Team Lokshahi

बांगलादेशतील आराजकतेचा कांदा निर्यातीला फटका बसल्याचं दिसत आहे. कांद्याचे शेकडो ट्रक भारत बांगलादेशाच्या सीमेवर अडकलेले आहेत. बांगलादेश हा भारतातील कांद्याचा मोठा आयातदार आहे बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात भारताकडून कांदा खरेदी केला जातो आणि त्या पार्श्वभुमीवर मोठ्या संख्येने निघालेले जे कांद्याचे ट्रक होते, ते मात्र सीमेवरचं अडकलेले आहेत. कारण बांगलादेशमध्ये सध्या अराजकता माजलेली आहे, त्याठिकाणी आंदोलन सुरु आहे तर हिंसक घटना घडताना दिसून येत आहेत.

नाशिकहून जाणारे कांद्याचे 80 ट्रक भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर अडकलेले आहेत आणि त्यामुळे व्यापारांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तर अडकलेला कांदा जवळच्या सीमेवर विक्री केला जाणार असल्याची अशी शक्यता आहे. तर नाशिकहून रोज 70 पेक्षा जास्त कांद्याचे ट्रक हे बांगलादेशला रवाना होत असतात मात्र मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंसाचार भडकलेला आहे. त्यामुळे हा कांदा विकला गेला नाही तर तो खराब होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com