व्हिडिओ
Bangladesh Crisis : बांगलादेशप्रकरणी संसदेतील सर्वपक्षीय बैठक संपली, बैठकीत काय घडलं ?
बांगलादेशप्रकरणी संसदेतील सर्वपक्षीय बैठक संपलेली आहे. यादरम्यान बैठकीत परराष्ट्रमंत्र्यांनी बांगलादेशातील स्थितीबाबत माहिती दिली आहे.
बांगलादेशप्रकरणी संसदेतील सर्वपक्षीय बैठक संपलेली आहे. यादरम्यान बैठकीत परराष्ट्रमंत्र्यांनी बांगलादेशातील स्थितीबाबत माहिती दिली आहे. सरकार संसदेमध्ये आज बांगलादेशबाबत निवेदन करणार आहे. तर बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह आणि राहुल गांधी हे सर्व जण उपस्थित होते. कालसुद्धा एक बैठक झाली होती, मात्र यामध्ये सरकारमधील जे काही मंत्री आहेत ते सर्व सहभागी झालेले होते तसेच केंद्र सरकारची बैठक झालेली होती.
तर आज सर्वपक्षीयांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. बांगलादेश जो भारताचा शेजारील देश आहे त्या ठिकाणी अराजकता पाहायला मिळत आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला, तर त्या भारतामध्ये आश्रयासाठी आलेल्या आहेत. यापार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक पार पडली.