Mumbai : सायन उड्डाण पुलावरून अवजड वाहतुकीस बंदी, बांधला जाणार नवीन पूल

सायन उड्डाण पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. उद्या रात्रीपासून पुलाचे पाडकाम होणार आहे.
Published by :
Dhanshree Shintre

सायन उड्डाण पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. उद्या रात्रीपासून पुलाचे पाडकाम होणार आहे. जुना पूल पाडून नवीन पूल बांधला जाणार आहे. सायन रोड ओव्हर ब्रीजवरून आता अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने सुरक्षेचा उपाय म्हणून सायन रोड ओव्हर ब्रीजवर अवजड वाहनांना प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव दिला आहे. शुक्रवार, शनिवारच्या मध्यरात्रीपासून अवजड वाहनांना प्रवेश प्रतिबंधित केला जाईल.

मध्य रेल्वे मार्गावरील सायन पूल पाडून नवीन बांधण्याबाबत सातत्याने हालचाली होत होत्या. मात्र, स्थानिकांनी केलेल्या विरोधानंतर जुना पूल पाडून नवी पूल बांधण्याचे काम पुढे ढकलण्यात आले होते. शिवाय लोकप्रतिनिधींनीही स्थानिक रेल्वे प्रशासनाची भेट घेत दहावी, बारावीच्या परीक्षा आणि इतर गोष्टी ध्यानात घेत पुलाचे काम पुढे ढकलावे, अशी विनंती केली होती. त्यामुळे पुलाचे पाडकाम पुढे ढकलले जात होते. मात्र, आता उद्या रात्रीपासून पुलाचे पाडकाम होणार आहे. सायन उड्डाण पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com