बदलापूरमध्ये कालच्या आंदोलनानंतर आज तणावपूर्ण शांतता; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली
Published by :
Siddhi Naringrekar

बदलापूरच्या शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बदलापूरच्या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून बदलापूर स्टेशनवर काल रेलरोको आंदोलन करण्यात आले.

बदलापुरात कालच्या आंदोलनानंतर आज तणावपूर्ण शांतता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली असून 12 तासांहून अधिक काळापासून इंटरनेट सेवा बंद आहे. बदलापूर शहराला पोलीस छावणीचे स्वरुप आले असून बदलापूर शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com