Pune Case : पुण्यातही बदलापूर! बसमध्ये चिमुरडीवर अत्याचार; राजकीय प्रतिक्रिया

नवरात्र दिवशीच्या पहिल्याच दिवशी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

नवरात्र दिवशीच्या पहिल्याच दिवशी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात स्कूल बसमध्ये 6 वर्षीय चिमूरडीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. स्कूल बस चालकाकडूनच मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. 45 वर्षीय नराधम बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या 4 दिवसांपासून बस चालक अत्याचार करत होता. पुणे शहराती वानवडी शहरातील ही धक्कादायक घटना आहे. आरोपी बस चालकाने आणखी काही मुलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे स्त्री शक्तीचा जागर होत असताना पुण्यातून मात्र संतापजनक प्रकार समोर आला आहे. सांस्कृतिक राजधानी पुण्यात नेमकं चाललंय तरी काय हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.

आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बस मधून शाळेत सोडण्याचे काम करत होता. या आरोपीच्या बसमध्ये दोन्हीपीडित चिमुरडी पुढच्या सीटवर बसवत असत. आरोपी चालवत असलेल्या बसमध्ये दोन्ही चिमुरडींना जवळ बसवून त्यांच्यासोबत लैंगिक अश्लील चाळे करत होता. या विषयाची वाचता कुठे केला तर धमकी सुद्धा देत असल्याची माहिती समोर आली आहे.

अल्पवयीन चिमुरडी घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेट ठिकाणी वेदना होत होत्या. यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर आरोपीने केलेला दुष्कर्म अल्पवयीन चिमुरडीने आईला सांगितला यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com