Badlapur: बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणी नागरिक आक्रमक

बदलापूरमध्ये धक्कादायक घटना दोन चिमुकल्या विद्यार्थ्यीनींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवदीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतं म्हणाल्या
Published by :
Team Lokshahi

बदलापूरमध्ये धक्कादायक घटना दोन चिमुकल्या विद्यार्थ्यीनींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. यामुळे पालक आणि नागरिक आक्रमक झाले आहेत. कोलकाताचे महिला डॉक्टर प्रकरण ताजे आणि चालू असताना आता महाराष्ट्रात या दोन लहान मुलींवर सफाई कामगाराने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

यापार्श्वभूमीवर राष्ट्रवदीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, हा अतिशय गंभीर असा मुद्दा आहे कारण शाळेमध्ये जर मुलींवर लैंगिक अत्याचार होत असतील तर, पालकांचा संताप अनावर होण शक्य आहे. या घटनेदरम्यान नागरिकांनी रेल्वेरोको आंदोलन केलं आहे कारण, या समस्येवर सरकारने आणि प्रशासनाने गांभीर्याने बघावं हे कारण आहे. यामुळे शासनाने आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं म्हणून संतापाच्या भावनेत नागरिक या प्रकारे आंदोलन करतं आहेत. तर त्या शाळेवर आणि जे कोणी त्या मुलींवर अत्याचार करण्यात सामिल होते त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

लोकांचा एवढा उद्रेक होईपर्यंत आपलं गृहखात काय करतं आहे? असा प्रश्न करतं पूढे त्या म्हणाल्या, गृहखात्याची जबाबदारी आहे ती अशा प्रकारचे अत्याचार होऊ नयेत म्हणून परंतु आता महाराष्ट्रामध्ये याचं प्रमाण वाढताना दिसत आहे. तसेच या घटनांवर जर नागरिकांकडून रास्तारोको आणि रेल्वेरोको आंदोलन होत असतील तर, त्यात नागरिकांचा दोष नसून आपल्या प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून यावर कठोर कारवाई करण्यात यावी.

पोलीसांनी आणि आपल्या प्रशासनाने या अशा घटनांकडे फार संवेदनशील होऊन पाहिलं पहिजे. जर पोलिसांनी या घटनेची दखल चार दिवसांच्या आधीच घेतली असती तर आज नागरिकांचा आणि पालकांचा इतका उद्रेक झाला नसता. त्यामुळे आपलं प्रशासन आणि आपली पोलीसयंत्रणा या समस्यांबाबत संवेदनशील नाही असं मला वाटतं, असं म्हणत विद्या चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com