Aawaj Lokshahicha | सत्ताधारी-विरोधकांच्या भांडणात लातूरचा विकास रखडला; कोण आहे लातूरकरांचा वाली?

लातूर या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपने डॉ. अर्चना चाकूरकर यांना उमेदवार दिली आहे.
Published by :
Team Lokshahi

लातूर हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी पाचवेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले, तर त्यांच्या निधनानंतर अमित देशमुख यांनी याच वारशाला पुढे नेले. गेल्या पंधरा वर्षांपासून अमित देशमुख या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामध्ये त्यांनी विविध विकास कामे हाती घेऊन मतदारांची मने जिंकली आहेत.

अमित देशमुखांच्या विरोधात भाजपने डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी दिली आहे. माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या कुटुंबातील सदस्य असलेल्या चाकूरकर यांना स्थानिक मतदारांमधील असंतोष आणि लिंगायत मतांचा लाभ मिळेल, असा अंदाज आहे. प्रचारादरम्यान त्यांनी देशमुखांविरुद्ध विकासाचे मुद्दे उपस्थित करत मतदारसंघात अधिक हजेरी राहून काम करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com