Aurangabad Petrol Pump : पेट्रोल मिळणार नाही समजताच औरंगाबादेतील पेट्रोल पंपांवर गर्दी
आज ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशन (All India Petrol Pump Association) केंद्र सरकारचा निषेध नोंदवणार असून पेट्रोल पंप डीलर्स आज पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) खरेदी तेल कंपन्यांकडून करणार नाही. देशभरातील इंधन दराच्या मुद्यावरून पेट्रोल पंप चालक-मालकांनी हा निर्णय घेतला असून पेट्रोल पंप मात्र सुस्थितीत सुरु राहणार आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची विक्री पंपांवर सुरुच राहणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याचा फटका वाहनचालकांना तरी बसणार नाही यावरून स्पष्ट होतं.
भारतीय तेल कंपन्यांनी देशातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आज महिन्याच्या शेवटच्य दिवशीही देशात पेट्रोल (Petrol) -डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नसून दर स्थिर आहेत. दरम्यान, केंद्र सरकारनं 21 मे रोजी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट करत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या (Diesel Price) किमती स्थिर आहेत.