Tuljabhavani Temple: तुळजाभवानी सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने प्रशासनाला फटकारलं

तुळजाभवानी सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रशासनाला फटकारलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

तुळजाभवानी सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने प्रशासनाला फटकारलं आहे. दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने फटकारण्यात आलेलं आहे. साडेआठ कोटींच्या दागिन्यांचा गैरव्यवहार प्रकरणी याचिका दाखल करण्यात आलेली आहे. अवमान याचिका प्रलंबित असल्याचं कारण देऊन गुन्हे दाखल करण्यास विलंब लावू नका असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

न्यायालयाने आदेशित करूनही भ्रष्टाचारांवर गुन्हे दाखल न झाल्याने हिंदू जनजागरन समितीने अवमान याचिका दाखल केली होती. साडेआठ कोटी रुपये व सोन्या चांदीचे दागिन्यांचा गैरव्यवहार प्रकरणी याचिका दाखल आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com