व्हिडिओ
लोकसभा निवडणुकीच्या कामगिरीवरुन विधानसभेच्या तिकिटाचा फैसला
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे. भाजप अनेक लोकसभा मतदारसंघात नवे चेहरे उतरवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईतल्या काही जागांवर भाजप नवे उमेदवार देण्याची शक्यता आहे. राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता आहे. जे.पी.नड्डा आणि अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर घेतला खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला त्यावेळी फेरबदलांवर चर्चा करण्यात आल्याची शक्यता आहे.