Rahul Narvekar | सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयावर बोलत नार्वेकरांची मोठी माहिती
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकताच शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केला. यावेळी राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटासोबतच ठाकरे गटाच्या आमदारांदेखील पात्र ठरवले आहे. हा निर्णय कशाच्या आधारावर घेतला याबाबत राहुल नार्वेकर यांनी लोकशाही पॉडकास्टमध्ये सांगितले आहे.
राहुल नार्वेकरांनी भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोर्टाने अवैध ठरवली आहे, असा गैरसमज पसरवला जात आहे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की राजकीय पक्षाचा प्रतोद त्यांचा इच्छेनुसार असावा. कोर्टाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून गैरसमज पसरवला जात आहे. कोर्टाने तीन मुद्यांवर राहुन निकाल घ्यायला सांगितलं होतं. कोर्टानं निकष दिले त्यानुसार मी निकाल दिला. निवडणूक आयोगाला जेव्हा विचारलं तेव्हा त्यांच्याकडे १९९९ ची घटना होती. राजकीय पक्ष संघटनात्मक रचनेला गांभीर्यानं घेतील. पक्षांतर्गत लोकशाही पाळलीच पाहिजे. कुणाला वाईट वाटेल याचा विचार केला नाही. नियम पाळून महाराष्ट्रासाठी निर्णय घेतला. कालच्या निर्णयानं संसदीय लोकशाही बळकट झाली, असे नार्वेकरांनी सांगितले आहे.