वंचितला मविआत स्थान मिळणार? चव्हाणांनी थेट सांगितलं, म्हणाले...

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत सामिल होण्यास इच्छुक आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : वंचितची भूमिका विरोधकांना मदत करायची आहे. मात्र मविआतून मलाच वगळत आहेत, अशी खंत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीसंदर्भातील निर्णय घेण्याकरता काँग्रसेने समिती स्थापन केली आहे. या समितीत सर्व राज्यनिहाय आघाडी अपेक्षित आहे. त्यावर २९ डिसेंबरपासून चर्चा होणार आहे. माझी व्यक्तिगत भूमिका निश्चित राहणार आहे की वंचितने प्रतिसाद दिला तर त्यांनाही आघाडीत घेतलं पाहिजं, असे अशोक चव्हाणांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com