अशोक चव्हाण यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावं या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आजपासून मराठवाडा दौऱ्यावर निघणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 13 जुलैची डेडलाईन दिली आहे.

यातच आता अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये अंतरवाली सराटीत जवळपास दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com