Ashish Deshmukh : भाजप नेते आशिष देशमुखांचा दिलीप वळसे पाटलांवर आरोप

सुनील केदारांवरुन आज महायुती जुंपलेली आहे. भाजप नेते आशिष देशमुखांचा दिलीप वळसे पाटलांवर आरोप, वळसे पाटील सुनील केदारांना वाचवत असल्याचा आरोप आशिष देशमुखांकडून करण्यात आलेला आहे.
Published by :
Team Lokshahi

सुनील केदारांवरुन आज महायुती जुंपलेली आहे. भाजप नेते आशिष देशमुखांचा दिलीप वळसे पाटलांवर आरोप, वळसे पाटील सुनील केदारांना वाचवत असल्याचा आरोप आशिष देशमुखांकडून करण्यात आलेला आहे. सहकारमंत्र्यांवर नागपूर जिल्हा बॅंकेची सुनावणी टाळण्याचा ही आरोप करण्यात आला आहे.

दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा सुनील केदारा यांनी केला त्यांना त्यासाठी न्यायालयाने शिक्षा टोटवली यासाठी पाच वर्षांसाठी त्यांना जेल देखील झाली. आज सहकारमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील हिअरिंग घेणार होते. पण त्यांनी ती अपरिहार्य कारणासाठी समोर ढकलली. जाणीवपूर्वक 22 वर्ष जशी ही कार्यवाही समोर ढकलण्यात आली त्याच पद्धतीने आपल्या पूर्वीच्या सहकाऱ्याला सुनील केदारांना वाचवण्याचं काम दिलीप वळसे पाटील करत आहेत, असं आशिष देशमुख म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com