व्हिडिओ
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली अटकेविरोधातील याचिका घेतली मागे
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. ईडीच्या अटकेला आव्हान देणारी याचिका अरविंद केजरीवालांनी मागे घेतली.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. ईडीकडून दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली.
ईडीच्या अटकेला आव्हान देणारी याचिका अरविंद केजरीवालांनी मागे घेतली. अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात केलेली याचिका मागे घेण्यात आलेली आहे. याचिका सुप्रीम कोर्टात मंजूर करण्यात आलेली आहे. कनिष्ठ न्यायालयात अरविंद केजरीवाल यांच्या कथित मद्य घोटाळ्यासंबंधितच्या प्रकरणावर सुनावणी सुरू असल्याने याचिका मागे घेतल्याचे सांगितले जात आहे. अरविंद केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून माहिती मिळाल्याचं कळतंय.