व्हिडिओ
कोरोनाचा पुन्हा धोका; अमरावती शहरात पुन्हा चार कोरोनाचे रुग्ण आढळले
कोरोनाचा पुन्हा धोका वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सूरज दहाट, अमरावती
कोरोनाचा पुन्हा धोका वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावती शहरात चार कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यासोबतच स्वाइन फ्लूचे रुग्णही आढळून आल्याची माहिती मिळत आहे. अमरावती शहरांमध्ये एकूण दहा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे.
नवीन पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने हे पुणे येथील प्रयोग शाळेमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता अमरावती शहरात भीतीचे वातावरण परसले आहे. अमरावती शहरात झपाट्याने कोरोना आणि स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावती आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.